टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा शनिवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणातील पाणिनी सभागृहात आयोजित या समारंभाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची, माजी विद्यार्थ्यांची आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयाकुमार यांनी…

