आमदार संजय केळकर.. जनसेवक..

भारतीय जनता पार्टी च्या स्थापने पासून साहेब आपण कार्यरत आहात. पक्षाशी निष्ठा कशी असावे याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. पक्षाचे अनेक चढ उतार तुम्ही पाहिलेत. अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्यात. पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पार पाडत आलात. माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. श्री अटलबिहारी वाजपेयीजी यांचा कार्यकाळ आपण बघितला आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय ‘अटल सन्मान पुरस्कार’…

Read More

वादग्रस्त घोडबंदर मार्गरुंदीकरणाचे काम थांबवले!

सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडून घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम स्थानिकांचा विरोध डावलून सुरू आहे. आज येथील रहिवाशांचा संताप अनावर झाल्याने हिरानंदानी पार्क १च्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची बाजू ऐकली. त्यांनी तत्काळ एमएमआरडीए अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात न घेता काम सुरू…

Read More

ठाण्यात ख्रिसमस सणासाठी रंगीबेरंगी केक आणि भेटवस्तूंचा बाजार बहरला..

१८ % जीएसटी कमी झाल्यामुळे क्रिसमस सणाच्या आनंदात बहर.. ठाणे – यंदा गुरुवार 25 डिसेंबर रोजी ठाण्यात अनेक ठिकाणी आगळ्यावेगळ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. त्यात ठाण्यातील बाजारापेठेत क्रिसमस सणासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे केक, सिक्रेट सांता चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स, चॉकलेट बुके, आदींचा साज नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. प्लम केक – ₹ 175सिक्रेट सांता चॉकलेट…

Read More

आचार संहिता लागू झाल्यापासून शहरातील 3778अनधिकृत पोस्टर्स महापालिकेने हटविले

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून ते दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील एकूण 3778 अनधिकृत पोस्टर्स, भित्तीपत्रके व बॅनर्स हटविण्यात आले आहेत. दि. 15 डिसेंबर 2025 ते…

Read More

चित्रीकरण झालेल्या नागाव मराठी शाळेतच रंगला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा ट्रेलर अनावरण सोहळा

शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला.वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी…

Read More

डोंबिवलीत पुन्हा रासायनिक प्रदूषणाचा धक्का; एमआयडीसीतील रस्ता झाला गुलाबी

डोंबिवली : डोंबिवली शहरात पुन्हा एकदा गंभीर रासायनिक प्रदूषणाचा प्रकार समोर आला आहे. शहराच्या एमआयडीसी परिसरातील संपूर्ण रस्ता चक्क गुलाबी रंगाचा झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही डोंबिवलीत रासायनिक प्रदूषणाच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या असून, त्यात आता आणखी एका प्रकाराची भर पडली आहे.

Read More

सरकार सकारात्मक: कायदेशीर बाजु पुर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार पूर्ण करणार ! एकनाथ शिंदे

नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (पुणे) विस्तारीकरणासाठी राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून, ही जागा स्मारकासाठीच आरक्षित करण्यासाठी सरकार न्यायालयात जनतेची बाजू मांडणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सरकारची ही भूमिका आंबेडकरी जनतेसाठी मोठा दिलासा ठरली आहे. नागपूर विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई…

Read More

मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार

ठाणे :- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शविल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्या विरोधात दंड थोपटले आहेत. शुक्रवारी (ता. १२ डिसेंबर२०२५) मनसे ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला.तसेच, येत्या काही दिवसात मनोरुग्णालयातील वृक्ष वाचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात…

Read More

राज्यातील ६० ठिकाणी ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ उभारणार! — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर :- विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ‘ संस्कार ‘ शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन

ठाणे : मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशानुसार बेकरी व तंदूर पदार्थ बनविणाऱ्या हॉटेलचालकांनी इंधनासाठी कोळसा व लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक असलेल्या एलपीजी, पीएनजी ‍किंवा ‍विजेचा वापर करणे बंधनकारक असून याबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस मा.अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या…

Read More
Back To Top