‘वृक्षबंधन’ उपक्रमाने ठाण्यात झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ठाणे :- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे ४० विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे…

