जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात ५० टक्के समस्या मार्गी..मुसळधार पावसातही नागरिकांची उपस्थिती
गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे १५० नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजुबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा…

