ठाण्यात ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यात रविवारी सकाळी आयोजित “नवदुर्गा वेलनेस सायकल राईड” उत्साहात पार पडली. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अनोख्या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तीन हात नाका येथील तुळजाभवानी मंदिरापासून झाली. प्रमुख पाहुणे दिग्दर्शक व समाजसेवक किरण नाकती यांनी हिरवा झेंडा दाखवत राईडला शुभारंभ केला….

