जिल्हा परिषद, ठाणे; ई-ऑफिसद्वारे कागदविरहित कामकाजाकडे दमदार वाटचाल
ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांमध्ये कागदविरहित कामकाजाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. प्रशासनातील सर्व फाईली ई-ऑफिस प्रणालीद्वारे तयार केल्या जात असून यामुळे कामकाजात पारदर्शकता, गती, तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचे जलद निराकरण प्रभावीपणे होत आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांमध्ये ई-ऑफिस प्रणालीअंतर्गत झालेल्या कामकाजाची प्रगती उल्लेखनीय आहे….

