ठाणे ॲथलेटिक्समध्ये नव्या विक्रमांची हॅटट्रिक….

ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित ५९ वी सिनीयर मैदानी स्पर्धा दि.७ व ८ जून २०२५ रोजी मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम ,मुंब्राकौसा या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सौ.संध्या मांड्रेकर यांच्या हस्ते झाला.सदर स्पर्धेत ठा.म.पा.ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजनेचा मन्नू सिंग यांनी १५०० मी.धावण्याच्या स्पर्धेत ४ मिनीटे ०४.९ सेकंद वेळ देत नवा जिल्हास्तरीय विक्रम…

Read More

‘ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेसोबत नागरिकांचीही जबाबदारी”आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन

ठाणे महापालिकेच्या पर्यावरणाशी निगडित उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन गावदेवी मैदानात आयोजित शून्य कचरा व पर्यावरण प्रदर्शनाला दिली भेटशनिवार-रविवारी प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुलेप्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद यांची नागरिकांसाठी अनोखी पर्वणी

Read More

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे जल्लोषात साजरा

ठाणे :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच शिवस्वराज्य दिन जिल्हा परिषद, ठाणे येथे आज अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेल्या या ऐतिहासिक घटनेचा स्मृतिदिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर शासन निर्देशानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो.

Read More

बांधकामांचा सुकाळ अन् पाण्याची पळवा – पळवी..आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती

ठाणे :- ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय…

Read More

उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देणे, या हेतूने उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक असून राज्यात पहिल्या आलेल्या धुळे- नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी…

Read More

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे राहत्या घरी निधन ते 92 वर्षाचे होते

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा…

Read More

मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंना शिवसेनेची व्यंगचित्रातून चपराक

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया आणि त्यांचे जवळचे मित्र व उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. याचा धागा पकडून शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून व्यंगचित्र काढून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मिठी नदी गाळ उपसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना…

Read More

रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’; रायगडाच्या बांधकामामागे खगोलशास्त्राचा आधार असल्याचा पुरावा

रायगड :- दुर्गराज रायगडाच्या वास्तुशिल्पामागे तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त विचार होता, याचा ठोस पुरावा नुकताच समोर आला आहे. रायगडावर सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ म्हणून ओळखले जाणारे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे. या यंत्राच्या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण संकेत मिळाला आहे. या उत्खननाचे कार्य भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास…

Read More

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दि. २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार…

Read More
Back To Top