प्रारंभ कला अकॅडेमी प्रस्तुत व डाॅ.अरुंधती भालेराव संचलित कै.कमल भालेराव यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त संवाद संवादकांशी
प्रारंभ कला अकॅडेमी प्रस्तुत व डाॅ.अरुंधती भालेराव संचलित कै.कमल भालेराव यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त संवाद संवादकांशी असा विनामूल्य पण दर्जेदार कार्यक्रम डाॅ.काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात संपन्न झाला.आई कुठे काय करतेय,होणार सून मी त्या घरची,ठिपक्यांची रांगोळी,तुमची मुलगी काय करते या सारख्या प्रसिद्ध मालिकांच्या लेखिका,निवेदिका, मुलाखतकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि जुळून येती रेशीम गाठी,कळत नकळत,मन मानसी आणि…

