रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांमुळे झाडांची कत्तल..कृत्रिम सावलीचा आसरा..

सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाण्यातील नैसर्गिक हिरवी अच्छायादन हरपली.. ठाणे :- वाढते शहरीकरण, रास्ता रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक हिरवी अच्छायादने हरपली आहे. या विकासकामांमुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांनी कत्तल करण्यात आली त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे महानगर पालिकेला कृत्रिम सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे. विकासकामांमध्ये…

Read More

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील बदली प्रक्रिया यशस्वीरीत्या पार

ठाणे :- जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट-क (वर्ग 3) व गट-ड (वर्ग 4) संवर्गातील कर्मचाऱ्यांची जिल्हांतर्गत प्रशासकीय, विनंती व आपसी बदली प्रक्रिया या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या सहभागाबरोबरच पारदर्शक व न्याय निर्णयप्रक्रियेवर भर देण्यात आला. समुपदेशनाच्या माध्यमातून दि. १५ मे, २०२५ रोजी, बी. जे. हायस्कुल येथे यशस्वीरित्या पार पडली.

Read More

दुसऱ्या लोकअदालतीत ठाणे जिल्हा अव्वल

ठाणे :- ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच डेबट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने, त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळालेली आहे. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पाच वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे व 30वर्षे जुनी असलेली एकूण 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. मोटार…

Read More

विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कुलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित

ठाणे :- विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा. आगी अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात. म्हणूनच, जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कुलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात…

Read More

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात मिरा-भाईंदर ते मुंबईतील पश्चिम- पूर्व उपनगर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन-9 ठाणे :- मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या आजच्या दिवशी, मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला औपचारिकपणे सुरुवात झाली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा कार्यान्वित होण्याच्या…

Read More

ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैनिकांवर शुभेच्छांचा वर्षा व होत असताना ठाण्यात शिवसेना तर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन

भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, असे शौर्य दाखवले म्हणून..;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ठाणे :- पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान बोलताना व्यक्त…

Read More

घोडबंदर मार्गावरील भाईंदर उड्डाणपूलाचे लोकार्पण, घोडबंदरची कोंडी सुटण्याची शक्यता

ठाणे :- घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपूलाचे आज बुधवारी (१४ मे) या दिवशी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते . हा उड्डाणपूल सुरु झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे….

Read More

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे :- 14 मे, 2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ठाणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Read More

घरातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यंदाही एकलव्य विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ठाणे :- समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक व कामगार नेते बिरपाल भाल यांची नात आदिती सुजीत भाल सफाई कामगार वसाहतीत राहून यंदा एसएससी परिक्षेत ६०% गूण मिळवून यशस्वी झाली. तिचे वडील बॅाटल्ड पाण्याचा व फेरीवाल्याचा व्यवसाय करतात तर आई ब्युटी पार्लर चालवते.आज लागलेल्या दहावी एसएससी निकालात ठाण्यातल्या लोकवस्तीत व परिसरातील ग्रामीण विभागातील एकलव्य विद्यार्थ्यांनी घरातील…

Read More

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अजिंक्य

ठाणे :- एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने एफटीएल एकादश संघाचा तीन गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक तेराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र…

Read More
Back To Top