ठाण्यात “द वूमन ऑफ इंडिया” चित्रप्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोग उपचार केंद्र डॉ. बेडेकर हॉस्पिटल आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असून, या निमित्ताने डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोथफेल्ड यांनी लिहिलेल्या “द वूमन ऑफ इंडिया” (१९२०) या ग्रंथावर आधारित असून,…

