मुंबई आमच्या साहेबांची…”, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित वऱ्हाडी मंडळींकडून विवाहस्थळी घोषणाबाजी
ठाणे : सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु असून अनेक नेते मंडळींच्या घरातील लग्न सोहळा थाटामाटात पार पडत आहेत. अशातच या लग्न सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांना आमंत्रितही केले जात आहे. यादरम्यान ठाणे शहरात झालेल्या काही विवाह सोहळ्याला महत्वाच्या राजकीय मंडळींनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात आठवड्याभरात दोन वेळा लग्न…

