भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाण्यात मनसेचे बॅनर
ठाणे : मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाण्यात जोरदार टीका केली आहे. दुबे यांनी “मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे” असे विधान केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत “दुबे मुंबई आ जाओ, आपको समुंदर…

