
‘ठाणे’ अडकतेय नशेच्या विळख्यात…युवावर्गासह शाळकरी विद्यार्थी राजरोस घेताहेत अंमली पदार्थ
ठाणे : ‘ठाणे’ नशेच्या विळख्यात अडकत चालले आहे. शाळा – महाविद्यालयांच्या आसपास असलेल्या पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असून ड्रग्ज तस्करांचा वावर शाळांच्या परिसरात वाढला आहे. यामुळे युवावर्गासह शाळकरी विद्यार्थी राजरोसपणे अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन अख्खी पिढी नशेच्या विळख्यात बर्बाद होत आहे. तेव्हा, तरुण पिढीला नशेच्या विळख्यात अडकविण्यासाठी ड्रग्सचे रॅकेट चालविणाऱ्या आणि…