स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पुणे :- ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात…

Read More

वडाच्या फांद्यांची कत्तल करत मोठ्या प्रमाणावर विक्री सुरूच..पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला संताप..

ठाणे: वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या उत्सवात वडाच्या झाडाचे खूप महत्व असते. यात सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आयु वाढीची मनोकामना करतात. मात्र एकीकडे पर्यावरण दिन साजरा करत झाडे वाचवा असे आवाहन पालिका करत आहे. मात्र दुसरीकडे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या फांद्या तोडून जागोजागी विक्री होताना दिसत आहे. याबद्दल…

Read More

दिवा मुंब्रा स्थानाका दरम्यान लोकल मधून पडून 5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी

दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने (सीएसएमटीहून) जात होती. त्यावेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली…

Read More

बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा – डाॅ.जितेंद्र आव्हाड

ठाणे – बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा – डाॅ.जितेंद्र आव्हाड मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड सहभागी ठाणे – विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल अन् त्यातून नागरिकांना फुफ्फसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या…

Read More

ठाणे ॲथलेटिक्समध्ये नव्या विक्रमांची हॅटट्रिक….

ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित ५९ वी सिनीयर मैदानी स्पर्धा दि.७ व ८ जून २०२५ रोजी मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम ,मुंब्राकौसा या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सौ.संध्या मांड्रेकर यांच्या हस्ते झाला.सदर स्पर्धेत ठा.म.पा.ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजनेचा मन्नू सिंग यांनी १५०० मी.धावण्याच्या स्पर्धेत ४ मिनीटे ०४.९ सेकंद वेळ देत नवा जिल्हास्तरीय विक्रम…

Read More

‘ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेसोबत नागरिकांचीही जबाबदारी”आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन

ठाणे महापालिकेच्या पर्यावरणाशी निगडित उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन गावदेवी मैदानात आयोजित शून्य कचरा व पर्यावरण प्रदर्शनाला दिली भेटशनिवार-रविवारी प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुलेप्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद यांची नागरिकांसाठी अनोखी पर्वणी

Read More

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे जल्लोषात साजरा

ठाणे :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच शिवस्वराज्य दिन जिल्हा परिषद, ठाणे येथे आज अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेल्या या ऐतिहासिक घटनेचा स्मृतिदिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर शासन निर्देशानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो.

Read More

बांधकामांचा सुकाळ अन् पाण्याची पळवा – पळवी..आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती

ठाणे :- ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय…

Read More

उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देणे, या हेतूने उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक असून राज्यात पहिल्या आलेल्या धुळे- नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी…

Read More
Back To Top