हिंदुस्थान जिंदाबाद’ च्या जयघोषाने ठाण्यात दुमदुमलेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिरंगा सन्मान यात्रा संपन्न
ठाणे :- काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’…’वंदे मातरम’… ‘भारत माता की जय’ या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख…

