निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न
ठाणे :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘रानभाज्या महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव आज, द. ६ ऑगस्ट, २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे येथे पार पडला. जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागांतून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व…

