ओवळा-माजिवडा क्षेत्रातील विविध विकासकामे १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले यंत्रणांना निर्देश ठाणे महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आढावा बैठक
‘ आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101

बातमी जी तीही तुमचीच
Your blog category
‘ आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
ठाणे :- ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय…
मुंबई :- एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देणे, या हेतूने उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक असून राज्यात पहिल्या आलेल्या धुळे- नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी…
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा…
मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया आणि त्यांचे जवळचे मित्र व उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. याचा धागा पकडून शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून व्यंगचित्र काढून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मिठी नदी गाळ उपसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना…
रायगड :- दुर्गराज रायगडाच्या वास्तुशिल्पामागे तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त विचार होता, याचा ठोस पुरावा नुकताच समोर आला आहे. रायगडावर सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ म्हणून ओळखले जाणारे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे. या यंत्राच्या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण संकेत मिळाला आहे. या उत्खननाचे कार्य भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास…
ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दि. २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार…
खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन दुर्लक्षित उद्यानाचा सुशोभिकरणातून होणार कायापालट ठाणे – लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून आज रविवार, दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजता या…
चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे ! यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार श्री. भरत अडूर यांना ! मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचे ठरले. या संमेलनातयावर्षींचा खगोलशास्त्र जीवन गौरव…
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19.ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आता महापालिका देखील कामाला लागली आहे. मागील तीन दिवसात 10 रुग्ण होते आता त्यामध्ये 9 रुग्णांची भर पडलीय. : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे,…