परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन
विकासाचं ठाणे, भविष्याचं ठाणे! ठाणे :- ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन करत आहे, याचा मला आनंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी…
प्रभाग २ आणि १०मध्ये भाजपचे उमेदवार विजयी होणार आमदार संजय केळकर यांचा विश्वास
राबोडीत प्रथमच भाजपचे कमळ फुलणार.. रॅली आणि सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राबोडीतील प्रभाग १० ड मध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा भाजप उमेदवाराला मिळत असून या मुस्लिमबहुल भागात प्रथमच भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे तसेच याच प्रभागातील भाजपचे अन्य दोन उमेदवारही निवडून येतील. तर घोडबंदर भागातील प्रभाग २ मध्ये भाजपचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येणार…
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो
लाडक्या बहिणी आणि ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे, :- ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरात पार पडला. या रोड शोला लाडक्या बहिणींसह अबालवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.विकास, आरोग्य, पाणी, गृहनिर्माण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त…
ठाण्यात आमचा काॅप तरी करा… रामदास आठवलेंचे शिंदेंना आर्जव…
ठाणे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत ठाण्यात आमचा काॅप तरी करा… अशी विनंती रामदास आठवले आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. परंतु शिंदे यांनी भाजपसोबत युती झाल्याचे सांगितले. तसेच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले. महापालिका निवडणुकीमध्ये…
‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’ उपक्रमासाठी पितांबरीचा पुढाकार !
ठाणे : ‘आर-निसर्ग’ या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पितांबरी कंपनीने आपल्या सीएसआर अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी (इलेक्ट्रिक) वाहन प्रदान…
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे दहा रत्नांचा समाज भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान
ठाणे :कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळाच्या सभागृहात कोकण ९६ कुळी…
आमदार संजय केळकर.. जनसेवक..
भारतीय जनता पार्टी च्या स्थापने पासून साहेब आपण कार्यरत आहात. पक्षाशी निष्ठा कशी असावे याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. पक्षाचे अनेक चढ उतार तुम्ही पाहिलेत. अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्यात. पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पार पाडत आलात. माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. श्री अटलबिहारी वाजपेयीजी यांचा कार्यकाळ आपण बघितला आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय ‘अटल सन्मान पुरस्कार’…
वादग्रस्त घोडबंदर मार्गरुंदीकरणाचे काम थांबवले!
सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडून घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम स्थानिकांचा विरोध डावलून सुरू आहे. आज येथील रहिवाशांचा संताप अनावर झाल्याने हिरानंदानी पार्क १च्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची बाजू ऐकली. त्यांनी तत्काळ एमएमआरडीए अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात न घेता काम सुरू…
ठाण्यात ख्रिसमस सणासाठी रंगीबेरंगी केक आणि भेटवस्तूंचा बाजार बहरला..
१८ % जीएसटी कमी झाल्यामुळे क्रिसमस सणाच्या आनंदात बहर.. ठाणे – यंदा गुरुवार 25 डिसेंबर रोजी ठाण्यात अनेक ठिकाणी आगळ्यावेगळ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. त्यात ठाण्यातील बाजारापेठेत क्रिसमस सणासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे केक, सिक्रेट सांता चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स, चॉकलेट बुके, आदींचा साज नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. प्लम केक – ₹ 175सिक्रेट सांता चॉकलेट…
आचार संहिता लागू झाल्यापासून शहरातील 3778अनधिकृत पोस्टर्स महापालिकेने हटविले
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजल्यापासून ते दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील एकूण 3778 अनधिकृत पोस्टर्स, भित्तीपत्रके व बॅनर्स हटविण्यात आले आहेत. दि. 15 डिसेंबर 2025 ते…

