ठाणे :- मुंबईत शुक्रवार 15 मे रोजी दुपारी 12-35 वाजता उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. तर ठाणे, डोंबिवली,कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवार 16 मे रोजी दुपारी 12-35 वाजता घेताला.
ठाण्यातील भगवती विद्यालयाच्या मैदानात मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग व डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन यांच्या सौजन्याने शून्य सावली दिवस प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ,भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर (जिल्हा) सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्यासह नागरिक, लहान मुलं, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले की,उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातूनच हा अनुभव घेता येऊ शकतो. वर्षातून दोनवेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने अनुभव घेता येत नाही. आपल्या गावच्या अक्षांशा इतकी सूर्याची क्रांती ( डिक्लिनेशन) झाले की त्यादिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर ' शून्य सावली'चा अनुभव घेता येतो.
दरम्यान ठाण्यात अश्या विज्ञान परिषद उपक्रमाला अजून प्रोत्साहन देत महापालिकेचं देखील सभाग मिळाला हवा. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या सभागा विषय येणाऱ्या काळात योग्य कार्य करत महापालिकेच्या सहकाऱ्याने युवा पिढीसाठी अशेच अनेक विज्ञान परिषद उपक्रम राबवणार असल्याचे डॉ. राजेश मढवी आणि नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

