
वंचित मुलांनी बनविला शाडू मातीचा बाप्पा
ठाणे :- पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत, ठाण्यातील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्रातील मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम ठाणे महानगरपालिका, पर्यावरण दक्षता मंडळ यांनी आयोजित केला होता. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्राच्या मुलांचे गूण ओळखून समाजसेवेच्या दृष्टीने प्रेरित झालेल्या ‘निर्मल आशा फाऊंडेशन’ने…