Thane Views

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कर्दे’ला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश…

Read More

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार 

नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पिक विम्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या हप्त्याची…

Read More

‘मुख्यमंत्री योजनादूत’ : शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास दि. 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50 हजार  “योजनादूत” नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. “योजनादूत” कार्यक्रमाच्या अंमलबजावणी…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-तीर्थ दर्शन योजना’

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते, त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय  प्रसिद्ध झाला आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा…

Read More

ग्रामीण भागाचा कायापालट करणारी ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजना’

ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम देणे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दुहेरी  उद्देशाने राज्यात ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गावा गावातील सार्वजनिक विकासाची विविध कामे हाती घेतली जातात. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणाऱ्या अनेक योजना या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यामुळे या योजनेच्या…

Read More

‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाचीही भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय…

Read More

जंगल क्षेत्रात व शेजारील गावात वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वाघांच्या स्थलांतरासह एआयचा वापर करु –  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

अलिकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे असलेले क्षेत्र व या क्षेत्रात वाघांची नेमकी असलेली संख्या ही तपासून घेतली पाहिजे. जर संख्या अधिक झाली असेल तर…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहर आणि परिसरातील १४२० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा नियोजन सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात…

Read More

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी – सुधीर मुनगंटीवार

शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुंबई, कोल्हापूर प्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा 150 एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करणार असून मराठी…

Read More
Back To Top