
घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा, विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
ठाणे : घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशीरापर्यंत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसला. सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारवडवली या दोन्ही मार्गिकांवर वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतुक करत होत्या. त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला. घोडबंदर मार्गावर…