ठाणे: शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र सदानंद फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज संकल्प प्रतिष्ठान तर्फे दहिहंंडी उत्सवानिमित्त पत्रकार परिषद पत्रकार घेण्यात आली.
संकल्प प्रतिष्ठान म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्याचे जतन करणारे व परंपरा जपणारे प्रतिष्ठान. दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच संकल्प प्रतिष्ठानमध्ये दिसत असते. यंदाही संकल्प दहिहंडी उत्सव येत्या १६ ऑगस्ट २०२५ रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे येथे संपन्न होणार आहे.
‘संकल्प प्रतिष्ठान आयोजित “संकल्प दहीहंडी उत्सव २०२५” याचे यंदा २० वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २१ लाखांचे पारितोषिक, ठाणे व मुंबई उपनगरात (MMRDA ) सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन ९ थर लावून सलामी देईल, त्या पथकाला ११ लाख रुपयांचे पारितोषिक व ९ थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहे. याबरोबरच गोविंदांकरिता सेफ्टी किट व जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यांसहित सुरक्षितेकरीता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना व भोजनाची विशेष सोय करण्यात आली आहे.
दहीहंडी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्वपूर्ण परंपरा. महायुती सरकारने या परंपरेला आता साहसी खेळाचा दर्जा दिला असून राज्यातील सुमारे १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात येणार असून इतर विविध कलाविष्कार यावेळी संकल्पच्या मंचावर सादर करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या सह महायुती चे सर्व नेते, मंत्री,आमदार, खासदार, विविध मान्यवर, तसेच मराठी हिंदी सिने सृष्टीचे नामवंत कलाकार ही प्रमुख उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक दिपक वेतकर, समाजसेवक राजेंद्र फाटक, मराठी सिने अभिनेते दिगंबर नाईक, अमिर हडकर व पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.