ठाण्यात ‘श्रावण महोत्सव २०२५’ चे उत्साहात आयोजन, महिलांनी घेतला मोठा सहभाग

ठाणे — जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना (ठाणे शहर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावण महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन आज ठाण्यात करण्यात आले. स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल, संभाजी नगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे शहरातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपर वुमन किचन पाककला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मेकअप स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच टाकाऊपासून टिकाऊ गृहउपयोगी वस्तू स्पर्धा यामध्ये महिला उत्साहाने सहभागी झाल्या. प्रत्येक स्पर्धेत स्त्रियांनी आपली कला आणि कौशल्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबीर,मोफत चष्मे वाटप आणि मोफत वहीवाटप यांसारख्या उपक्रमांचा अनेकांनी लाभ घेतला.

सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 4 वाजेपर्यंत रंगला. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष : धिरज सांबरे,शिवसेना महिला आघाडी प्रमुख व माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका निर्मला कणसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ संस्थेचे सर्व सदस्य यांच्या उत्तम आयोजनातून उत्कृष्ट असून महिलांना व्यासपीठ देणारा एक सकारात्मक उपक्रम ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

या स्पर्धामध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक
११,०००
द्वितीय पारितोषिक
५,०००
तृतीय पारितोषिक ३,०००
उत्तेजनार्थ ५ पारितोषिके प्रत्येकी १,००० रोख रक्कम
अशी बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top