अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

ठाणे दि : पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त, त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेण्यासाठी, मुंबई येथील भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन यांच्याकडून राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा तीन गटात होईल. सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल आणि प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक ₹१००००/- व द्वितीय क्रमांक ₹७०००/- हे पारितोषिक रोख रक्कम आणि पुस्तके यांच्या स्वरूपात असेल. तसेच उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी ₹५००/- ची पुस्तके असतील.

सदर स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशाची व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. स्पर्धेचा निकाल ३० सप्टेंबर २०२५ ला तर बक्षीस वितरण २६ ऑक्टोबर २०२५ ला होणार आहे. स्पर्धेचे गट, विषय, वेळ मर्यादा, नियम व अटी जाणून घेण्यासाठी 8424867070 या नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज करावा.

सदर स्पर्धेला मार्गदर्शक तज्ञ म्हणून डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. बाबासाहेब दुधभाते, डॉ. निलेश शेळके, डॉ. रमिला गायकवाड, डॉ. रामकिशन दहिफळे, अँड. अभिमान पाटील, डॉ रमेश पिशे, डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ ताहेर पठाण, डॉ शैलेंद्रकुमार शर्मा, डॉ भरत ठाकोर लाभलेले आहेत. तर आयोजक समितीमध्ये डॉ. वर्षा चौरे, प्राचार्य अन्वर शेख, मुख्याध्यापक प्रभाकर घाटुळे, राजीव हाके, रामभाऊ लांडे, अनिलकुमार ढोले, बिरू कोळेकर, अरविंद सुरोशे, प्रा. जावेद पाशा, डॉ प्रभू चौधरी, उमेश कोर्रम, उमेश चाफे, डॉ. पांडुरंग श्रीरामे यांचा समावेश आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन इतिहासातून प्रेरणा घेत भविष्याचा वेध घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top