ठाणे :- पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत, ठाण्यातील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्रातील मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम ठाणे महानगरपालिका, पर्यावरण दक्षता मंडळ यांनी आयोजित केला होता.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्राच्या मुलांचे गूण ओळखून समाजसेवेच्या दृष्टीने प्रेरित झालेल्या ‘निर्मल आशा फाऊंडेशन’ने या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
सदर प्रसंगी स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्राचे विजय जाधव, रूपा फाळे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या कविता वालावलकर, जया वाघ, सुरभी ठोसर, निर्मल आशा फाउंडेशनचे विनायक गाडे, मनीष वाघ, रूपा गाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प. द.मंडळाचे प्रशिक्षक राकेश ताम्हणकर यांनी मुलांना शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनविण्यास शिकविले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.