ठाण्यात शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौर दणक्यात

ठाण्यात शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौर दणक्यात

नूतनीकरणानंतर रश्मी ठाकरे पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुखांनी उभारलेल्या गडकरी रंगायतन वास्तूमध्ये

प्रवेशद्वाराजवळील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला अभिवादन

ठाणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी आयोजित “खेळ खेळू मंगळागौरचा, सोहळा सजवू संस्कृतीचा” या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन करण्यात आले. या कुटुंब सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थित राहत महिलांच्या आनंदात भर टाकली. प्रवेशद्वाराजवळील हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला रश्मी ठाकरे यांनी अभिवादन केले. यावेळी महिलांच्या उपस्थितीने गडकरी रंगायतन हाऊसफुल्ल झाले होते. घागर घुमू दे घुमू दे, रामा पावा वाजू दे…. नाच ग घुमा, कशी मी नाचू…. फुगड्या ग खेळू पोरी फुगड्या.. अशा अनेक गाण्यावर महिला थिरकल्या. तसेच यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. ज्या महिलांचे नावे लकी ड्रॉ मध्ये आली, अशा महिलांना भरीजरी पैठणी भेट देण्यात आली. यावेळी नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुश्मिता भोसले यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी रश्मी ठाकरे यांनी सर्व महिलांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top