ठाणेकर कन्या शौर्या हिने भारताच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

आशियाई युवा क्रीडा स्पर्धे मध्ये रौप्य पदक पटकवल्या बद्दल शौर्या चे ठाण्यात स्वागत

ठाणे :-बहरीन इथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धे मध्ये 100 मिटर हर्डल्स स्पर्धेत रौप्य पदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकवल्या नंतर आज ठाण्यात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला, या वेळी एकनाथजी शिंदे यांनी शौर्या अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केले.

मूळची ठाणेकर असलेल्या शौर्या अंबुरे हिने 13.73 सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले तिच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे,

या वेळी पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले कि देशासाठी खेळल्यावर आणि रौप्य पदक मिळाल्यावर मला खूप छान वाटतंय ,देशासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे असे सांगितले.
या वेळी तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, शौर्या चे वडील पोलीस उपायुक्त श्री.अविनाश अंबुरे व आई पोलीस उपायुक्त सौ.रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top