ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामे प्रगतीपथावर खासदार नरेश म्हस्के

फलाट क्रमांक २, ३ आणि ४ वरुन १५ डब्यांच्या लोकल धावणार

फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील एक्सलेटरचे काम लवकरच मार्गी

शौचालयांची देखभाल ‘डी मार्ट’ करणार

मायक्रोटेक’ मुळे पावसाळ्यात रुळांवरील पाण्याचा निचरा लवकर होणार

नवीन वर्षात प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित बनविण्याची खासदार नरेश म्हस्के यांची ग्वाही

ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवण्यात आल्याने १५ डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फलाटांवर जास्तीत जास्त एक्सलेटर बसविण्याचे काम तेजीत सुरु आहे. साफ आणि स्वच्छ शौचालयगृहेही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. पावसाळ्यात रुळांवर साठण्याऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ‘मायक्रोटेक’द्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. रेल्वे स्थानाकांवर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध  होणार आहे. ही सर्व विकासकामे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी सुरु असून त्यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. तसेच विकासकामांत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. 

खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसत आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकासकामे सुरु आहेत. या कामांचा आढवा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी पाहणी दौरा केला. 

यावेळी रेल्वेच्या थॉमस (असिस्टंट डिव्हिजनल सिग्नलिंग अँड टेलिकॉम इंजिनिअर), एस.के. सिंग (वरिष्ठ विभाग अभियंता जनरल), राजीव रंजन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, अल्लापुरे (सहाय्यक विभागीय अभियंता),  सय्यद इक्बाल अहमद (सहाय्यक सुरक्षा आयुक्त, आरपीएफ), अपर्णा देवधर (स्टेशन मॅनेजर), संजय कुमार (वरिष्ठ विभाग अभियंता बांधकाम), शरद गायकवाड (वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल), सुरेंद्र कोष्टा (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), नवीन कुमार (वरिष्ठ विभागीय अभियंता, दूरसंचार), मिलिंद शिंदे (मुख्य बुकिंग पर्यवेक्षक), रणजीत झा – मुख्य वाणिज्य निरीक्षक, शिवसेना पक्ष सचिव विलास जोशी, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, शहर समन्वयक भास्कर पाटील, ठाणे शहर लोकसभा सचिव दत्ताराम गवस, उपशहरप्रमुख जयप्रकाश कोटवणी, विभागप्रमुख प्रशांत पाटील, विभाग संघटक रीना मुदलियार, प्रभा सकपाळ, ठाणे शहर विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, नौपाडा विभाग प्रमुख किरण नाक्ती, ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, कोपरी विभाग प्रमुख संतोष बोडके, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते. 

वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ती मंजूर होऊन कामास सुरुवातही झाली आहे. आता हे काम तेजीत सुरु असून १५ डिसेंबरपर्यंत हे मार्गी लागणार आहे. ३१ डिसेंबरपासून या तिनही फलाटांवर १५ डब्यांची लोकल थांबणार आहे. लांबी वाढविल्याने ३ अतिरिक्त डब्यांतून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.  

फलाट क्रमांक ५ आणि ६ वर एक्सलेटर बसविण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आता पर्यंत ४ नवीन एक्सलेटर बसविण्यात आले आहेत. एका एक्सलेटरचे काम प्रलंबित असून यावरून खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. फलाटावर एक्सलेटरला अडथळा ठरणारे मंदिर स्थलांतरित करून एक्सलेटरचे काम तीन दिवसात सुरु करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तर फलाट क्रमांक ७, ८, ९ आणि १० वर एक्सलेटर बसविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे. या फलाटांवर एक्सलेटर बसल्यास लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस मधून येणाऱ्या वयोवृध्द, लहान मुले, महिलांना सोयीचे होईल. स्वच्छतागृहांसाठी डीमार्टशी करार करण्यात आला असून खासदार नरेश म्हस्के यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छ, निगा, देखभाल बाबत सूचना केल्या.

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साठते आणि लोकलचा वेग मंदावतो. यासाठी ‘मायक्रोटेक’द्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र पावसाळ्यात हे काम बंद होते. आता हे काम सुरू झाले असून डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top