ठाणे : ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून महापालिकेचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेली म्युनसिपल लेबर युनियनबरोबर संलग्न असून प्रशासन व कर्मचारी यांच्यात सौहार्द्र व शांततापूर्ण वातावरण रहावे म्हणून कार्यरत राहणार आहे.
नेहमीच कामगारांचे विविध प्रश्न घेऊन ठाणे म्युनिसिपल लेबर युनियन ही संघटना नेहमीच विविध प्रश्न कामगारांचे सोडविण्यासाठी सक्रिय असते. सातवे वेतन आयोग, कामगार भरती, वाढीव वेतन, यांसारखे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या महापालिकेतील अभियंत्यांच्या विविध समस्यां सोडविण्यासाठी एक महत्व पूर्ण पाऊल उचलले आहे.
आज यासंदर्भात ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली या नियुक्तीबद्दल पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी ‘ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या
तसेच ठाणे महापालिकेच्या उन्नतीसाठी व ठाणेकर नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी भविष्यात आपण घेणार असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता अभियंते नेहमीच तत्पर राहतील असे यावेळी ‘ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनचे अध्यक्ष श्री. चेतन आंबोणकर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले
त्यांच्यासह यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद निंबाळकर, उपाध्यक्ष रामदास शिंदे, सरचिटणीस स्वप्नील काशीद, खजिनदार राजेश सावंत तसेच प्रवीण सापळे,
उपाध्यक्ष किशोर गोळे
खजिनदार राजेश सावंत
महेश बोराडे
जन्मजय मयेकर
रामकृष्ण देसले
सय्यद दावलशाह
चिटणीस विजय खानविलकर, जमनाताई जाधव,
गणेश भालेकर व इतर पदाधिकारी सभासद, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

