ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.अतुलचंद्र कुलकणी साहेब, सन्मा.सदस्य, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अति.अधीक्षक श्री.राजाराम भोसले यांनी मा.श्री.अतुलचंद्र कुलकणी साहेब, यांच्या सेवाकार्याचा परिचय देवून करण्यात आली त्यानंतर श्रीमती.राणी रा.भोसले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांविषयी माहिती दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये बेकरी उत्पादन, डेकोरेटिव्ह वॉल पेंटिंग, संगणक प्रशिक्षण, दुचाकी दुरुस्ती, एम्ब्रॉयडरी, सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. यावेळी 84 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच एका महिला बंदीने बी.ए.मध्ये पदवी संपादन केल्यामुळे सदर महिला बंदयांचा यावेळी पदवी प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
मा..श्री.अतुलचंद्र कुलकणी साहेब, यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बंद्यांनी आत्मविश्वासाने समाजातचे मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे स्व:तचे पुनर्वसन करून स्वतःचे जीवन उन्नत करण्याचे बंदयांना आवाहन केले. तसेच, कारागृह प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून, कारागृह व सूधारसेवा विभागामध्ये या अशा प्रकारे आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे बंद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी अशा या उपक्रमामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल असे सांगितले. यावेळी उपअधीक्षक श्री.डी.टी.डाबेराव,वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.कैलास भंवर, श्री.नागेश पाटीलए श्री.संदीप सरपते इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लक्ष्मण साळवे, शिक्षक यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. विलास कापडे, उपअधीक्षक यांनी मान्यवरांचे, उपस्थित सर्व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी-कर्मचारी व उपस्थितांचे मान्यवर बंदी विद्यार्थ्यांचे आभार मानून केले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.
