ठाणे :- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्व. वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा ठाण्यात संपन्न झाला.
या कार्यक्रमात १०० शिक्षकांचा, २५ शिक्षकेतर कर्मचारी व १० शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार अॅड. निरंजन डावखरे म्हणाले, “शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून, त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव आहे.”
कार्यक्रमाला या प्रसंगी ठाणे शहर आमदार श्री. संजय केळकर, मा. खासदार श्री. विनय सहस्रबुद्धे , शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली.

