श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा ३९ वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न होत आहे..
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा-अर्चा आणि आरतीने झाली. यानंतर उपस्थित साईभक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले.
उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्व. बळीराम वासुदेव नाईकबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम, तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे .
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नाईकबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक,सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे,विश्वस्त हरी माळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव आदिसह कर्मचारी व ब्राम्हण वर्ग आणि मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत.

