शहीदोके सन्मान में, देशभक्त उतरे मैदान मे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ठाण्यातून पाठवले सिंधूर

ठाण्यात जोरदार आंदोलन ; क्रिकेट नाही, युद्ध खेळू….. पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा

ठाणे, प्रतिनिधी – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी शहा सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा ‘खेळ’ सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात आज ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन करत निषेध केला. शहीदोके सन्मान में, देशभक्त उतरे मैदान मे… क्रिकेट नाही, युद्ध खेळू….. पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा यावेळी संतप्त ठाणेकरांनी दिल्या. देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहिदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंधूर पाठवून पहलगाम च्या भ्याड हल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली.

    ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात देण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना चंदनवाडी शाखा येथे  केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. या क्रिकेट सामन्याच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहे. या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडली. शिवसेनेच्या रणरागिणीनी घराघरातून सिंधूर जमा करून पाठवण्यात आले. 

यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मनेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे
,जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, उपजिल्हा संघटिका आकाश राणे ,महेश्वरी तरे ,ज्योती कोळी , ठाणे विधानसभा संघटिका प्रमिला भांगे, वैशाली शिंदे ,विद्या कदम, स्मिता इंदुलकर ,अनिता प्रभू ,कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पालता भानुषाली, कल्याण ग्रामीण विभाग संघटिका
योगिता नाईक ,कळवा शहर समन्वयक निलीमा शिंदे उपशहर संघटिका माधुरी ठाकरे,, स्नेहल सावंत ,ज्योती पाटील, शोभा गरांडे माजी नगरसेवक नंदिनी विचारे , अंकिता पाटील, ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई , समन्वयक संजय तरे,ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ,दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, प्रकाश मोहिते मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम ,ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण ,वसंत गव्हाळे ,परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, कळवा-मुंब्रा विधानसभा संघटक चंद्रकांत विधाटे, , संजय ब्रीद, प्रमिलाताई भांगे नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक मंदार विचारे, तसेच विभागप्रमुख ,उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख , विशेष करून महिला पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही मोदींची पोकळ घोषणा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी जाहीर सभामधून मोठमोठ्या घोषणा केल्या. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अशी घोषणा दिली होती. मात्र काही दिवसांतच नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला याचा विसर पडला. देशवासीयांच्या भावनांचा विचार न करता आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली. मोदींना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top