भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिर दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी वर्तक नगरातील कै. द. ल. मराठे प्राथमिक विद्यालय (ब्राम्हण विद्यालय) येथे पार पडले. यावेळी १००० हून जास्त नागरिकांनी रुग्ण नोंदणी करून विविध आरोग्य तपासण्या आणि ३०० नागरिकांची आयुष्मान कार्ड नोंदणी केली.
शिबिरामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. १००० हून अधिक नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणी, ई.सी.जी. तपासणी, रोगनिदान आदी आरोग्यसेवा तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ घेतला. आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमात केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार सुविधा मिळण्यासाठी आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून व मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन होत आहे. ठाण्यात दर महिन्याला असे मोफत शिबिर नियमितपणे घेण्याचा संकल्प आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय आहे.”
या प्रसंगी ठाणे शहर आमदार मा. श्री. संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, ठाणे पालघर महाराष्ट्र माथडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष श्री. संजयजी वाघुले, ठाणे जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील,
कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक श्री. सचिन मोरे, श्री. विक्रम भोईर, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष श्री. मनोहर सुगदरे, १४६ ओवळा माजीवाडा विधानसभा- सह संयोजक व जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. अक्षय सुभाष तिवरामकर, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सौ. श्रुती महाजन कोंगनोळीकर, भाजपा ठाणे शहर म मा. उपाध्यक्षा सौ. अनुराधा रोडे, भाजपा सदस्य व जनकल्याण फाउंडेशन च्या सचिव सौ. अंकिता तिवरामकर मीरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ठ श्री. अंशूल मल्होत्रा तसेच विक्रांत चव्हान,राकेश चौगुले, वैभव कदम, निलेश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे मंडल अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिराबाबत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम लोकाभिमुख व समाजोपयोगी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.