.सरस्वती सेकंडरी स्कूलच्या छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी साकारकेल्या “राजगड ” किल्ल्याच्या भव्य प्रतिकृती ला
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर निवड
भारतीय पुरातन शास्त्र संस्थेच्या पुणे विभाग आणि येसाजी कंक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील दुर्ग प्रतिकृती स्पर्धेत सरस्वती शाळेचे छात्र सैनिक उत्साहाने सहभागी झाले होते.. “राजी यांचा गड, गडांचा राजा असे संबोधिले जाणाऱ्या ” राजगड या किल्ल्याची २४० चौरस आकारमान असलेली भव्य हुबेहूब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस मेहनत करुन् बनवली होती.
या राजगड किल्ल्याच्या या प्रतिकृतीने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
प्रतिकृती बनवण्यात सहभागी झालेले ,सरस्वती छात्र सेनेचे विद्यार्थी.

