प्रारंभ कला अकॅडेमी प्रस्तुत व डाॅ.अरुंधती भालेराव संचलित कै.कमल भालेराव यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त संवाद संवादकांशी असा विनामूल्य पण दर्जेदार कार्यक्रम डाॅ.काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात संपन्न झाला.
आई कुठे काय करतेय,होणार सून मी त्या घरची,ठिपक्यांची रांगोळी,तुमची मुलगी काय करते या सारख्या प्रसिद्ध मालिकांच्या लेखिका,निवेदिका, मुलाखतकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि जुळून येती रेशीम गाठी,कळत नकळत,मन मानसी आणि आता स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेली लग्नानंतर होईलच प्रेम या सारख्या मालिकांमधून गाजत असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री ,मुलाखतकार नृत्यांगना,निवेदिका ऋतुजा देशमुख यांच्याशी प्रारंभ कला अकादमीच्या संचालिका डाॅ.अरुंधती भालेराव यांनी अगदी दिलखुलास पणे संवाद साधला.
या सेलिब्रिटीज चे वैयक्तिक आयुष्य म्हणजेच त्यांचे बालपण, व्यवसायात येताना त्यांनी केलेली धडपड, त्यांंना आलेले चांगले वाईट अनुुभव हे खुमासदार प्रश्नांंनी उलगडण्यात आले.त्याही पेक्षा या प्रवासात काही वाईट अनुभव ही आले पण स्वत:भोवती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रेघ आखून स्वत:चे आयुष्य व करिअर कसं अबाधित ठेवलं याचा ही उल्लेख संवादातून उलगडला. आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल घर ,संसार,जबाबदारी यांचा समतोल कसा राखला या
सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांनी डाॅ. अरुंधती भालेरावांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली .दूरदर्शन वरील अनेक मालिकांमधून
स्री चे नकारात्मकच रंगवले जाणारे चित्रच कां असते या सामान्य प्रेक्षकालाही पडणाऱ्या प्रश्नाने कार्यक्रमाची वेगळीच उंची गाठली.अखेेर रॅपिड फायर च्या प्रश्नांनी मजेदार रंगत आणली.
या रंगतदार कार्यक्रमाची सांगता इतक्या लवकर व्हायला नको होती हा विचार मनाशी घोळवत रसिक प्रेक्षागृहातून बाहेर पडला.
