प्रभाग २ आणि १०मध्ये भाजपचे उमेदवार विजयी होणार आमदार संजय केळकर यांचा विश्वास

राबोडीत प्रथमच भाजपचे कमळ फुलणार..

रॅली आणि सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राबोडीतील प्रभाग १० ड मध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा भाजप उमेदवाराला मिळत असून या मुस्लिमबहुल भागात प्रथमच भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे तसेच याच प्रभागातील भाजपचे अन्य दोन उमेदवारही निवडून येतील. तर घोडबंदर भागातील प्रभाग २ मध्ये भाजपचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात अनेक ठिकाणी रॅली आणि सभांचा धडाका सुरू असून आज प्रभाग २ आणि प्रभाग १० मध्ये झालेल्या रॅली आणि सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभाग १० मध्ये भाजपचे दिलीप कंकाळे, विनया भोईर आणि जमीर जलील सिद्दिकी (फरहान) तर शिवसेनेच्या गीता वैती हे उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅली आणि सभेत आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना भाजप उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. १० ड मधील उमेदवार जमीर जलील सिद्दिकी (फरहान) यांनी आमदार केळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्या सोडवताना शासकीय योजनांचा लाभ शिबिरांच्या माध्यमातून मिळवून दिला. त्यामुळे येथील नागरिकांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा वाढत आहे. यावेळी श्री. केळकर यांनी ‘मैं मजहब की बात नहीं करता हुं, आपके मसले छुडाना चाहता हुं’ असे सांगत विकास करने के लिये आप मेरा साथ दे’, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. येथील नागरिकांचा प्रतिसाद आणि एकमेव तगडा उमेदवार पाहता या मुस्लिमबहुल प्रभागात भाजपचे कमळ प्रथमच फुलणार असून भाजपचे दिलीप कंकाळे, विनया भोईर आणि शिवसेनेच्या गीता वैती हे उमेदवार देखील बहुमताने निवडून येतील, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला.

आज घोडबंदर येथील प्रभाग दोन मध्ये भाजपचे उमेदवार विकास पाटील, अर्चना मणेरा, मनोहर डुंबरे आणि कमल चौधरी यांच्या प्रचार रॅलीत आमदार केळकर सहभागी झाले होते. या प्रभागात श्री.केळकर यांनी अनेक समस्या मार्गी लावल्या असून नागरिकांशी सतत संपर्कात होते. त्यामुळे या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रभागात भाजपचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी होईल, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला.

कोपरी येथील प्रमुख नेते आणि माजी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी उप महापौर अशोक भोईर, विक्रम भोईर, कृष्ण भुजबळ, सचिन पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top