मुंबई आमच्या साहेबांची…”, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित वऱ्हाडी मंडळींकडून विवाहस्थळी घोषणाबाजी

ठाणे : सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु असून अनेक नेते मंडळींच्या घरातील लग्न सोहळा थाटामाटात पार पडत आहेत. अशातच या लग्न सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांना आमंत्रितही केले जात आहे. यादरम्यान ठाणे शहरात झालेल्या काही विवाह सोहळ्याला महत्वाच्या राजकीय मंडळींनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात आठवड्याभरात दोन वेळा लग्न सोहळ्याला उपस्थित लावली. शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार स्व.अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांचा मुलगा विशाल या भावा बहिणी च्या विवाह सोहळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. परंतू, उद्धव ठाकरे या विवाह सोहळ्यास येताच वऱ्हाडी मंडळींकडून ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची’ अशी घोषणाबाजी सुरु झाली. या घोषणांकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
सदर विवाह सोहळ्याला वधू वराना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक,हितचिंतक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top