उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयातशुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय. पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला आता जगातला कोणताही नेता रोखू शकणार नाही. प्रगतीचा आणि विकासाचा हा महारथ कोणीच थांबवू शकणार नाही. आत्मनिर्भर भारत हा कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही, हे मी खात्रीनं सांगतो. भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ.पवन बनसोड, पंकज शिरसाट, सुभाष बुरसे, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ठाणे महानगरपालिका उपायुक्त मधुकर बोडके, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उपसंचालक सीमा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन वाघ, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, तहसिलदार संदिप थोरात, उमेश पाटील, सचिन चौधर, रेवण लेंभे, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, स्मिता मोहिते, अमोल कदम, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, गोरख फडतरे, गिरीश काळे, उमेश महाला, दत्तात्रय बेर्डे, सहायक संचालक (नगररचना) दिशा सावंत, व्यवस्थापक अश्विनी कोकाटे, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.