काजूवाडी वैती नगर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळा तर्फे यावर्षी बद्रीनाथ मंदिराचा देखावा सकरण्यात आला आहे. यांना देखव्यात पर्यावरण पूरक असा देखावा बनवण्यात आला आहे या मंडळाची लहान व मोठी मूर्ती ही कागदाच्या लागद्या पासून बनविण्यात आलेली आहे सर्वच मंडळानी अश्या प्रकारची मूर्ती बनवून पर्यावरणाचे संवर्धन करावे असे माजी महापौर अशोक वैती यांनी म्हंटले आहे.
मंडळा तर्फे दहादिवसात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात तसेच दहादिवस सर्व समाजाचे भजन कीर्तन सदर केली जातात तसेच ह्या बद्रीनाथ मंदिराचा देखावा उभारण्या मागे ज्या नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा देखावा उभारण्यात आला असल्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी पत्रकारांशी बालतांना सांगितले.