
खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन
दुर्लक्षित उद्यानाचा सुशोभिकरणातून होणार कायापालट
ठाणे – लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून आज रविवार, दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजता या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. रीप रीप पावसातही हिरानंदानी इस्टेट परिसरातील रहिवासी, जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका कविता पाटील, माजी नगरसेविका कमल चौधरी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण नागरे, पातलीपाडा शाखाप्रमुख संजय मोरे, हिरानंदानी रेसिडेंशिअल असोसिएशनचे चेअरमन अध्यक्ष मधु मेनन, जेष्ठ नागरिक, महिला आणि मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे शासन स्तरावर पाठपुरावा करून खासदार नरेश म्हस्के यांनी निधीची उपलब्धता केल्याने कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
५.६ एकर जागेवर असलेल्या या उद्यानातील हिरवळीला कोणतीही बाधा न आणता केवळ १० टक्के भागाचा विकास करण्यात येणार आहे. रहिवासी सध्या खडकाळ तर पावसाळ्यात चिखल तुडवत चालत असलेल्या पायवाटेवर पदपथांची निमिर्ती करण्यात येणार आहे. या पदपथामुळे वयस्कर नागरिकांना चालणे सुलभ होणार आहे. योग साधना तसेच झुंबा व इतर गायन, गायन वादनाच्या हौशी कलाकारांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओपन जिम सुरु करण्यात येणार आहे. या उद्यानात भरपूर हिरवाई असल्याने फुलपाखरू गार्डनाची निर्मिती केली जाणार आहे. तलाव आणि उद्यान याच्या मध्ये स्काय वॉच टॉवर उभारला जाणार आहे, जेणे करून रहिवाशांना एकाच वेळी हिरवळ आणि तलावाचे निरीक्षण करता येईल. तलाव किनारी रुफकव्हर उभारले जातील. या मध्ये बसून उन्हाळा असो व पावसाळा रहिवाशांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. काही ठिकाणी छोटे अत्याधुनिक साकव बांधण्यात येणार आहेत. या पुलांवरून चालताना ॲक्युप्रेशरचा अनुभव घेता येणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे शहराच्या विकासासाठी नेहमीच भरीव निधी देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानत कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण होण्यासाठी पाठपुरावा करणारे शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण नागरे तसेच माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका कविता पाटील, माजी नगरसेविका कमल चौधरी यांचेही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले.
हिरानंदानी इस्टेट सीनियर सिटीझन्स फाउंडेशन अध्यक्ष श. डी. पी. त्रिपाठी, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इव्हान अध्यक्ष चेतना सिंग, रवीश दोबानी, रोडस लाफ्टर क्लब श्री कुलकर्णी, किरण ठाकूर, रोडास सीनियर सिटीझन ग्रुपचे पदाधिकारी व्ही. जी. राव, श्री सी एन शेट्टी, किम्स हॉस्पिटल क्षेत्रीय प्रमुख सौरभ गुप्ता, रोडस वरिष्ठ नागरिक अध्यक्षा श्रीमती कमलताई फुटाणे यावेळी उपस्थित होते.
समाजमाध्यमामधून उद्यानाच्या उभारणीबाबत काही गैरसमज पसरविण्यात आले होते, त्याचे यावेळी मोठ्या स्क्रीन वर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करून निराकरण करण्यात आले. तसेच खासदार नरेश म्हस्के यांनीही रहिवाशांशी संवाद साधत प्रकल्पाचे काम समजावून सांगितले. गैरसमजाचे निराकरण झाल्याने उपस्थित सर्व रहिवाशांनी उद्यान सुशिभिकरणाचे स्वागत केले.
खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि वचनपूर्ती केल्याबद्दल त्यांचा रहिवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आला.