ठाणे – डाॅ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा बजावत होत्या. पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष एड. कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कँडल मार्चचे आयोजन केले होते.
कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कँडल मार्चची सुरूवात झाली. या प्रसंगी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डाॅ. संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कँडल मार्चमध्ये मा.नगरसेवक प्रकाश बर्डे, मा. नगरसेविका रिटा यादव ,युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, रचना वैद्य प्रदेश प्रवक्त्या युवती कार्याध्यक्ष पूजाताई शिंदे ,विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन, मकसूद खान , मनीषा ताई कारलाद, कल्पनाताई नार्वेकर, युवक ब्लॉक अध्यक्ष निखिल तांबे ,प्राची पाटील, लालचंद सरोज, पांडुरंग बेंद्रे ,विशांत गायकवाड, रोहिदास पाटील, राजू पाटील, अंकुश मडवी राजनाथ यादव प्रशांत गोळे, स्वप्नील मोरे, पंकज सिंग सिद्धांत कांबळे, सुरेश साळवे आदी उपस्थित होते.

