दिव्यामध्ये सदगुरू नगर आणि शीळ रोडवरील ०५ अनधिकृत इमारतींवर कारवाई

   ठाणे : दिवा प्रभाग समिती क्षेत्रात, अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतींवर ठाणे महापालिकेने सोमवारी कारवाई केली. या अर्धव्याप्त, व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

   मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी. आर. नगर येथील दोन इमारती, सदगुरू नगर मधील २ इमारती आणि दिवा-शीळ रोड येथील १  इमारत अशा एकूण पाच इमारतींवर पोकलेन मशीनचे सहाय्याने कारवाई करण्यात आली. या पाचही इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या.

    महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे, महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे. 

    सोमवारी, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाई प्रसंगी, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते. अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top