भारतीय रेल्वेने लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “अहिल्यानगर” असे केले आहे
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर असे ठेवले आहे.
हे महाराष्ट्र शासनाने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा घेतलेल्या निर्णयानुसारही करण्यात आले आहे.
यापूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे अहिल्यानगर असे नामांतरित करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व सर्व्हेअर जनरल ऑफ इंडियाच्या पत्रानुसार, स्थानकाचे नवे नाव खालीलप्रमाणे वाचले व लिहिले जाईल :
देवनागरी लिपी (मराठी): अहिल्यानगर
देवनागरी लिपी (हिंदी): अहिल्यानगर
रोमन लिपी (इंग्रजी): AHILYANAGAR
अमळनेर (भां) आणि अहिल्यानगर दरम्यान रेल्वे सेवा आधीच सुरू आहेत.
अमळनेर (भां) – बीड नवीन रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन केले जाईल आणि बीड आणि अहिल्यानगर दरम्यानच्या पहिल्या ट्रेनला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते दि. १७.९.२०२५ रोजी हिरवा झेंडा दाखवला जाईल.
बीड – अमळनेर (भां) खंडामध्ये ६ स्थानके आहेत. बीड, राजुरी (नवगण), रायमोहा, विघनवाडी, जाटनंदूर आणि अमळनेर (भां)
प्रवासी व सर्वसामान्य जनतेने या बदलाची नोंद घ्यावी, अशी विनंती करण्यात येते.