मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाला रौप्य पदक
जयपूर | खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 या प्रतिष्ठित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. या यशस्वी संघात आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी अभ्युदय चौधरी आणि झाकूओ सेई यांनी प्रभावी भूमिका बजावली.
मुंबई विद्यापीठाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत मणिपूर विद्यापीठ, एम.जी. विद्यापीठ केरळ आणि एस.आर.एम. विद्यापीठ आंध्र प्रदेश या संघांवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
संघाचे मुंबई विद्यापीठाचे मॅनेजर व कोच प्रा. सुशांत दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट रणनीती आणि समन्वय दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विलास ठूसे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखीते, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

