ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले, ठाणे स्टेशन मास्तर अपर्णा देवधर मॅडम, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष श्री देशमुख, नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, शरीफ शेख, हनीफ खान, जगदीश मोहिते आदिजण उपस्थित होते.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ सेवा पंधरवडा सुरु असून त्यानिमित्ताने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत चा नारा दिला आहे. स्वच्छ रेल – स्वच्छ भारत, स्वच्छता हीच सेवा या भावनेने प्रत्येकाने काम केले पाहिजे. जसा एस टी हा गरिबांचा रथ आहे तशी रेल्वे ही गरिबांचा रथ आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतभर रेल्वेचे जाळे विणले गेले आहे. अशक्य अशा मार्गावरून रेल्वे प्रवास सुरु केला आहे. रेल्वे प्रवास नागरिकांसाठी अधिक सुरक्षित झाला आहे. माझ्या प्रयत्नाने ठाण्यातील रेल्वे स्थानाकात देशातील पहिली रेल्वे धावली त्या रेल्वेचे ऐतिहासिक रेल्वे इंजिन सामान्य नागरिकांसाठी बसविण्यात आले आहे असे आमदार संजय केळकर यांनी बोलताना सांगितले.