आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आज तक्रारदारांनी रिघ लावली होती. ढोकाळी येथे विकासकाने 14 वर्षापासून इमारतीचे बांधकाम न केल्याने अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. तसेच म्हाडा संदर्भातील विषय, ठा म पा मधील कर्मचाऱ्यांचा पदोन्नत्ती विषय, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत विषय, अनधिकृत बांधकाम विषय, नोकरी संदर्भातील विषय, एस आर ए व क्लस्टर बाबत विषय, असे अनेक विषय आ. केळकर यांच्या जनसंवाद या कार्यक्रमात नागरिकांनी आणले होते. यातील काही विषय आ. केळकर यांनी संमधीत अधिकाऱ्यांना फोन करून निकाली लावले. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी खोपट कार्यालयात माजी उमहापौर अशोक भोईर, सुरज दळवी, जितू मढवी, योगेश भंडारी आदिजण उपस्थित होते.
विविध क्षेत्रात फसवणूकीचे प्रकार खूप वाढले असून, त्यात विकासकाने फसणूक केलेल्या तक्रारी माझ्याकडे जास्त प्रमाणात आल्या आहेत. याबाबत नागरिकांनीही जागृत राहिले पाहिजे. तसेच जेष्ठ नागरिकांनी गुंतवलेले पैशात ही फसवणूक झाली आहे. रस्त्याकडील फुटपाथवर वाढत चाललेल्या अनधिकृत स्टॉल संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निदर्शणास आणून दिल्या असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.