भारतीय जनता पार्टी च्या स्थापने पासून साहेब आपण कार्यरत आहात. पक्षाशी निष्ठा कशी असावे याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. पक्षाचे अनेक चढ उतार तुम्ही पाहिलेत. अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्यात. पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पार पाडत आलात. माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. श्री अटलबिहारी वाजपेयीजी यांचा कार्यकाळ आपण बघितला आहे.
आपल्याला आंतरराष्ट्रीय ‘अटल सन्मान पुरस्कार’ मिळाला. मनाला अतीव आनंद झाला. ‘जे पेराल तेच उगवेल’ हे या पुरस्काराच्या निमित्ताने दिसले. अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले. तुम्ही पुरस्कारासाठी कधीही काम केले नाही. पण आपल्याला मिळालेल्या सर्व पुरस्कारांपैकी हा सर्व श्रेष्ठ असा पुरस्कार आहे.
ज्या महानायकाच्या विचारावर तुम्ही चाललात, चालत आहात त्या महानायकाच्या नावाने तुम्हाला पुरस्कार मिळणे म्हणजे तुमच्यासाठी अभिमानास्पद आहेच शिवाय आम्हा ठाणेकरांचीही मान या पुरस्कारामुळे उंचावली आहे.
आम्हाला आपला अभिमान आहे साहेब..
एक ठाणेकर नागरिक..

