आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी भेट

ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर `सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या अभियानाअंतर्गत आईबाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठामपा प्रभाग क्रमांक २२ मधील ६० वर्षांपुढील ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबीर माजी नगरसेविका सौ. नम्रता जयेंद्र कोळी आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी राम गणेश गाडकरी रंगायन येथे आयोजित केले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजपा ठाणे शहर (जिल्हा) सरचिटणीस समीरा भारती, भाजप नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले, रक्षा यादव, भाजप ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष सचिन केदारी, घनश्याम भुयाळ, भाजपाचे अमित नांदगावकर, योगेश भंडारी, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडळ सरचिटणीस प्रतीक सोलंकी, नितेश तेली, मयुरेश भालेराव, अन्वेष जयगडकर, मच्छिमार सेल अध्यक्ष नयन दळवी, मीनाक्षी मिस्त्री, सुनीता कोळी, शिला कोळी, निखत सारंग, मुकेश सावंत, तनुश्री अगावणे,रवी गाडेकर,साईश सावंत,राजू परदेशी, मणिलाल सतरा,परेश शाह,अंकुश थावरे,उपदेश देसाई,शरीफ शेख, हनीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. आयोजक माजी नगरसेविका सौ. नम्रता जयेंद्र कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की, सौ. नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दांपत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे. कोळी दांपत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही तर वर्षाचे ३६५ दिवस ते विविध उपक्रम राबवित असतात. गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप, विभागातील नारिकांना पावसाळ्यात छत्री वाटप, आरोग्य शिबिरे भरविणे अशा अनेक कार्यक्रमांतून नागरिकांची ते सेवा करत असतात. नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून कोळी दांपत्य करत असलेली मदत वाखाणण्याजोगी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात `सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध १५ कार्यक्रम देण्यात आले आहेत. त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे. जेष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते. कोळी दांपत्याने आज दिलेली आधाराची काठी खरेच त्यांची आधार बनणार आहे. आज गडकरी रंगायतनमध्ये जेष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दांपत्याप्रति असेलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक म्हणाल्या.

अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचे कुपनही देण्यात आले आहे. कोळी दांपत्याने आज जेष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य केल्याचे संदीप लेले म्हणाले.

आम्ही विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवित असतो. गेल्या १५ दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोहोचपावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top